LIVE UPDATES

Mandki Village Dussehra : मांडकी गाव पुन्हा एकत्र! ३५ वर्षांचा वाद संपला

साडेतीन दशकांनंतर एकत्रित दसरा साजरा होणार; गावात एकजुटीच्या नव्या पर्वाला सुरुवात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 15:04 PM
views 48  views

चिपळूण : तालुक्यातील मांडकी गावाने तब्बल ३५ वर्षांपासून सुरू असलेले मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गावात साडेतीन दशकांनंतर एकत्रितपणे दसरा साजरा होणार असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘एक गाव, एक विचार, एकजूट आणि एकच जल्लोष’ या भावनेतून गावाने सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

मतभेदांना तिलांजली; एकोप्याचा संकल्प

विविध कारणांमुळे मांडकी गावात गेल्या अनेक वर्षांपासून दोन गट निर्माण झाले होते. परिणामी दसरा, महाशिवरात्र आणि शिमग्यासारखे पारंपरिक धार्मिक सण एकत्रितपणे साजरे करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, गावाची एकजूट आणि सामाजिक सलोखा महत्त्वाचा असल्याची जाणीव झाल्यानंतर दोन्ही गटांनी जुने मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय केवळ दसरा सणापुरता मर्यादित नसून, भविष्यातील सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव एकत्रितपणे साजरे करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

ग्रामस्थांसह मान्यवरांचे सहकार्य

गावातील एकजूट प्रस्थापित करण्यासाठी उपसरपंच संतोष खैर, खोत नारायण खैर, मांडकी बुद्रुकचे सरपंच अनंत खांबे, पोलीस पाटील सचिन खैर, मांडकी खुर्दचे सरपंच सोनू धुमक, पोलीस पाटील संजय धुमक, संदीप खांबे, डॉ. ज्ञानेश्वर खांबे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अन्य मान्यवरांचे सहकार्य लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आमदार शेखर निकम यांच्याकडून अभिनंदन

मांडकी गावाशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असलेले चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी गावातील ३५ वर्षांचे मतभेद दूर होऊन ग्रामस्थ एकत्र आल्याची माहिती मिळताच दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. गावाची एकजूट कायम ठेवून परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोकणातील गावांसाठी प्रेरणादायी निर्णय

धार्मिक सण, मानपान आणि पारंपरिक प्रथांवरून निर्माण होणारे मतभेद संवाद आणि सामंजस्यातून दूर करता येतात, हे मांडकीच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे गावाचा हा निर्णय कोकणातील अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.

यंदाचा दसरा मांडकी गावासाठी केवळ विजयादशमीचा सण नसून, मनामनांतील कटुता आणि दुराव्यावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव ठरणार आहे. ‘जुने वाद विसरूया, नाती नव्याने जोडूया; गावाच्या एकजुटीतून आनंदी भविष्य घडवूया!’ असा संदेश देत मांडकी ग्रामस्थांनी एकतेच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.

ताजी बातमी

View all

दामिनी पालव दुर्दैवी मृत्यूप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन
October 19, 2026
Sitaram Raul from Dodamarg receives international recognition for wildlife photography highlighting Tillari Valley biodiversity
तिलारीच्या सूक्ष्म जीवसृष्टीची जागतिक स्तरावर दखल
October 19, 2026
High-tension power line passing over the Meditation Yoga Centre construction site at Narendra Hill in Sawantwadi
Sawantwadi Yoga Centre Safety Issue : मेडिटेशन सेंटरच्या कामात 'हाय टेन्शन' विजेच्या तारेचा अडथळा
October 19, 2026
सावंतवाडीचा मोती तलाव दुर्गंधीच्या विळख्यात | Sawantwadi Moti Lake facing pollution concerns due to alleged drainage water discharge
Sawantwadi Moti Lake : सावंतवाडीचा मोती तलाव दुर्गंधीच्या विळख्यात
October 19, 2026
संबंधित बातम्या