LIVE UPDATES

कोलगाव पांडवनगरीच्या दुर्गा मातेचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले दर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 19:59 PM
views 18  views

सावंतवाडी : कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले. यावेळी मंडळाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाला नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व सभापती दिपाली भालेकर यांनी भेट देत देवीच दर्शन घेतले. यावेळी मंडळांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गटनेते बाबुराव चव्हाण, कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर चव्हाण, विजय चव्हाण, गणेश म्हापणकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.