LIVE UPDATES

आपट्याची पाने लुटत सीमोल्लंघनाचा विधी

राजघराण्याचा ऐतिहासिक दसरा उत्साहात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 12:48 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : संस्थानच्या  ऐतिहासिक परंपरेनुसार विजयादशमीच्या मुहुर्तावर सावंतवाडी राजघराण्यानं उत्साहात सीमोल्लंघन केले. ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणात हा सोहळा अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला.

दसरा उत्सवाचे औचित्य साधून सावंतवाडी राजघराण्याचे प्रमुख खेम सावंत भोसले यांनी राजवाड्यात विधिवत पूजा केली. पुरोहीत शरद सोमण यांनी या धार्मिक विधींचे पौरोहित्य पार पाडले. पूजेनंतर परंपरेनुसार सर्वप्रथम खेम सावंत भोसले यांनी आपट्याची पाने लुटत सीमोल्लंघनाचा विधी पूर्ण केला. यानंतर राजघराण्यातील इतर मान्यवरांनी तसेच उपस्थितांनी आपट्याची पाने देत दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास सावंतवाडी राजघराण्यातील राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या. तसेच  ॲड. शामराव सावंत, काका मांजरेकर, नगरपरिषद सभापती आनंद नेवगी, बाळासाहेब बोर्डेकर यांच्यासह सावंतवाडी आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.