LIVE UPDATES

विशाल परब आमदार होऊ देत !

कोलगाव येथे दुर्गामातेच्या चरणी साकडं
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 12:55 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले. यावेळी मंडळाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच ते आमदार होउदेत असं साकडं घालण्यात आले.

कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाला भेट देत श्री. परब यांनी देवीच दर्शन घेतले. यावेळी मंडळांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गटनेते बाबुराव चव्हाण, कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर चव्हाण, विजय चव्हाण आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सावंतवाडी तालुक्यातील बांदा, विलवडे, माडखोल आणि निगुडे येथील विविध मंदिरांना तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेटी देऊन श्री. परब यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे, संकटांचा सामना करण्यासाठी कोकणवासीयांना बळ मिळावे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदावी, असे साकडे आदिशक्तीच्या चरणी घातले.