
सावंतवाडी : भाजपा युवानेते विशाल परब यांनी सावंतवाडी येथील नवदुर्गांचे दर्शन घेतले. विविध मंडळांना भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. सावंतवाडीतील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळ, माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळ, ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ आदींसह विविध मंडळांच्या नवदुर्गांचे दर्शन त्यांनी घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप युवामोर्चा सावंतवाडी अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे, स्वप्नील राऊळ, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी बाजारपेठ मंडळाचे हे ३६ वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, श्रीकांत म्हापसेकर, अतुल पेंढारकर, संतोष मुंज, नंदू गावकर, नितीन मुंज, शैलेश गवंडळकर, प्रसाद देऊलकर, विशाल वाडकर, बाबू मेस्त्री, दत्ता सावंत यांनी विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all









