
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली. हॉस्पिटल शेजारील जुन्या सीएस बंगल्याच्या जागेत डॉक्टरांसाठी गव्हर्नमेंट क्वार्टर्सच्याबाबत त्यांनी लक्ष वेधले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आरोग्यमंत्र्यांच्या ओसडींना प्रत्यक्ष जागेवर घेऊन जात जागेची पाहणी केली.
उपजिल्हा रुग्णालयातील पाहणीवेळी आम. श्री. केसरकर यांनी फोनवरून डॉ. सांगळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी डॉक्टरांसाठीच्या आवश्यक गव्हर्नमेंट क्वार्टर्सच्याबाबती त्यांनी लक्ष वेधले. या जागेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ओएसडींना ही जागा दाखवली. जिल्हा रुग्णालय सावंतवाडीत असताना सीएस बंगला या ठिकाणी होता. मात्र, आता ही इमारत नादुरुस्त झाली असून या जागेत नवीन इमारत उभारल्यावर डॉक्टरांची सोय होऊ शकते.
हॉस्पिटलच्या अगदी लगद ही जागा असल्याचे श्री. परब यांनी ओएसडींच्या निदर्शनास आणून दिले. तर रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निमित्ताने देखील डॉक्टरांच्या निवासासाठी ही जागा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सांगळे यांनी याबाबत आमदार दीपक केसरकर व आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणुन घेतल्याबद्दल डॉ. सांगळे यांचे आभार मानले. आरोग्याचे प्रश्न निश्चितपणे सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








