
वैभववाडी : तालुक्यात पावसाने काही काळाच्या विश्रांतीनंतर आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाअभावी पाणीपातळी कमी होऊ लागल्याने आणि पिके संकटात सापडल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, विजांच्या कडकडाटामुळे काही भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील पाणीपातळी कमी होऊ लागली होती. पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा सुरू होती. अशा परिस्थितीत आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.तसेच भात कापणीच्या कामातही काही प्रमाणात व्यत्यय आला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








