LIVE UPDATES

शिरवली येथील संदीप जामदार यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 12:34 PM
views 11  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : देवगड तालुक्यातील शिरवली-  जामदारवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक संदीप गंगाराम जामदार (53 ) यांचे सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा.अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे. देवगड तालुक्यातील चाफेड गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण राणे यांचे ते साडू होत.

संदीप जामदार हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. ते मुंबई- गिरगांव येथील विल्सन हायस्कुल मध्ये क्लार्क या पदावर कामाला होते.