LIVE UPDATES

शिरवलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आरोग्य व सल्ला शिबिर

संदीप चौकेकर मित्रमंडळाचा ‘सेवा संकल्प’ उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 19:02 PM
views 31  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल खासकिलवाडी येथे संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानांतर्गत आरोग्य व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन संदीप चौकेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नवरात्र उत्सवाच्या काळात देवीच्या उपासनेसह सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास योग्य सल्ला घ्यावा, या दृष्टीने अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित होते.

या आरोग्य शिबिरासाठी शिरवल येथील समुदाय आरोग्य अधिकारी मयुरी कलमितस्कर, आरोग्य सेवक दत्ताराम सुर्वे, प्रयोगशाळा कर्मचारी, आशा सेविका मेधना पांचाळ आणि मदतनीस अनिता घाडीगांवकर यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

यावेळी समीक्षा चौकेकर, कृष्णा यादव, विजय चौकेकर, दत्ताराम पेडूरकर, वसंत पेडूरकर, रामचंद्र गोळवणकर, कृष्णा गावडे, कविता गावडे, आरती गावडे, रामचंद्र गावडे, राजाराम दळवी, अरुण चौकेकर, जयश्री चौकेकर, श्रद्धा यादव, अजय चौकेकर, तेजस चौकेकर, रूप रुपेश चौकेकर आणि पल्लवी पेडूरकर आदी उपस्थित होते.

संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


ताजी बातमी

View all

Ratnagiri Drought Relief : जिल्ह्यात दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज : डॉ. उदय सामंत
October 17, 2026
खेर्डी एमआयडीसीत ३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
October 17, 2026
कणकवलीत परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
October 17, 2026
कुडाळमध्ये सोमवारी 'दुर्गामाता दौड'चे आयोजन
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

Dr Swapnil Sangle and Sanju Parab inspect the proposed site for government quarters for doctors near Sawantwadi Hospital.
Sawantwadi Hospital News : डॉक्टरांना गव्हर्नमेंट क्वार्टर्ससाठी हालचाली, आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून पाहणी
October 17, 2026
Dr Swapnil Sangle inspects healthcare facilities at Sawantwadi Sub District Hospital in Sindhudurg
Sawantwadi Health News : सिंधुदुर्गातील समस्यांवर आरोग्यमंत्र्यांच संवेदनशीलपणे लक्ष
October 17, 2026
सावंतवाडीतील भगवान महावीर दवाखान्यात दोन दिवसांत डॉक्टर उपलब्ध होणार
October 15, 2026
ग्रामपंचायत अणसूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात
October 15, 2026