LIVE UPDATES

म्युझिक कॉर्नरकडून नवदुर्गांचा सन्मान

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 18, 2026 19:12 PM
views 256  views

सावंतवाडी : म्युझिक कॉर्नर सावंतवाडीच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कार्याची दखल घेऊन हा गौरव म्युझिक कॉर्नरच्या सर्वेसर्वा उमा हावळ यांच्या हस्ते करण्यात आला. 

जयप्रकाश चौक येथील म्युझिक कॉर्नर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.‌ उमा हावळ यांच्या हस्ते सौ. कांचन सिद्धये, निलाक्षी आकेरकर, सानिका मुणगेकर, ऐश्वर्या कोगरवाकर, संगीता शेलटकर, सरिता फडणीस, आरकान डिसोझा, दिक्षा पेडणेकर, रुपा मुद्राळे आदींचा गौरव करण्यात आला. तसेच राजश्री हावळ यांचा देखील सन्मान करण्यात आला. 

समाजात जिद्द, चिकाटी व मेहनतीने नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांचा सन्मान करावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांचा सन्मान करत असल्याची भावना म्युझिक कॉर्नरचे मालक राजन हावळ यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना उपस्थित महिला भावूक झाल्या. आपल्या कार्याची दखल घेऊन केलेल्या सन्मानासाठी त्यांनी ऋण व्यक्त केले. याप्रसंगी उमा हावळ, राजन हावळ, रितेश हावळ, देवता हावळ, रितीका हावळ, दर्शना रासम, सुबोध शेलटकर, मिलींद फडणीस, आनंद रासम, रमेश हावळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन हावळ यांनी केले. सूत्रसंचालन दर्शना रासम यांनी तर आभार रितीका हावळ यांनी मानले.