
सावंतवाडी : कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी घेतले. यावेळी मंडळाचे गटनेते बाबुराव चव्हाण यांनी संजू परब आमदार व्हावेत असे साकडे देवी चरणी घातले.
कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाला त्यांनी भेट देत देवीच दर्शन घेतले. यावेळी मंडळांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. परब यांच्याकडून मंडळाला देणगी स्वरुपात मदत करण्यात आली. याप्रसंगी गटनेते बाबुराव चव्हाण, कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, विजय चव्हाण, गणेश म्हापणकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








