LIVE UPDATES

सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमीतर्फे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

५५ विद्यार्थ्यांचा सहभाग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 20:03 PM
views 11  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने कै. सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. खासकीलवाडा येथील राजवाड्याजवळील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात स्पर्धा घेण्यात आली. 

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात स्पर्धा खेळविण्यात आली. स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळांमधील पंचावन्न विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. ॲकेडमीचा चार वर्षे नऊ महिन्याचा सर्वात लहान खेळाडू अवधूत गावडे याने देखील स्पर्धेत सहभाग नोंदवला. मुक्ताई ॲकेडमी तालुक्यातील विदयार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेली दहा वर्षे बुदधिबळ आणि कॅरम स्पर्धांचे आयोजन करत आहे. जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचा पहिला राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे रोटरी क्लब अध्यक्ष प्रवीण परब यांनी पहिली ते चौथी गटाची पारितोषिके पुरस्कृत करत असल्याचे कळविले.

स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी रोटरी क्लबचे सचिव सुहास सातोसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार आणि सम्राट इंटरनॅशनल क्लबचे भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मुंबई येथील जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या संचालिका अनुपमा शेटगे, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर, कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अव्वल मानांकित राष्ट्रीय खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कौस्तुभ पेडणेकर यांनी ॲकेडमीच्या मागील दहा वर्षातील कार्याचा आढावा घेतला. ॲकेडमीने दहा वर्षात बुदधिबळचे सदतीस आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आणि कॅरमचे सोळा राज्यस्तरीय आणि तीन राष्ट्रीय खेळाडू घडविले. ॲकेडमीने अनेक सेमिनार, स्पर्धांचे आयोजन केले.

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड येथील विदयार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, यश सावंत, पुष्कर केळूसकर, गार्गी सावंत, अथर्व वेंगुर्लेकर, नऊ वर्षाचे पुर्वांक कोचरेकर, विघ्नेश अंबापूरकर आणि सहा वर्षाची दिव्यांका नार्वेकर या राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालक डाॅ.मुकुंद अंबापूरकर, किरण सावंत, मंदार ठाकूर, विनायक नार्वेकर, संजय राऊळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई ॲकेडमी बुदधिबळ आणि कॅरम खेळातील राष्ट्रीय खेळाडू तयार करत असल्याचे कौतुक केले.

मोबाईलपासून दूर राहून एकाग्रता वाढवणा-या या खेळांकडे वळण्याचा सल्ला त्यांनी विदयार्थ्यांना दिला. हरिश्चंद्र पवार यांनी बाळकृष्ण पेडणेकर याचे कौतुक करताना कौस्तुभ पेडणेकर आणि बाळकृष्णच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे केले हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सम्राट क्लबच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-गोवा अंतर्गत बुदधिबळ स्पर्धा घेण्याचा विचार पवार यांनी बोलून दाखविला.

सुहास सातोसकर आणि हरिश्चंद्र पवार यांनी बोर्डवर चाल खेळुन स्पर्धेचे उदघाटन केले. लवकरच मुक्ताई ॲकेडमीच्या सहकार्याने रोटरी क्लब जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सातोसकर यांनी जाहीर केले. सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.


ताजी बातमी

View all

दोडामार्ग तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस
October 19, 2026
घराचे कुलूप तोडून अतिक्रमण केल्याच्या वादातून मारहाण
October 19, 2026
सावंतवाडी पोलीस ठाण्यासह तीन ठिकाणी सहा सिमेंट बेंचेस
October 19, 2026
कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सरस्वती विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Ratnagiri Cricket Death News : क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू
October 19, 2026
Smriti Mandhana and Shafali Verma during India Women vs Zimbabwe Women T20I match
Smriti Mandhana and Shafali Verma Record : स्मृती-शेफालीचा ऐतिहासिक विक्रम! एका वर्षात १,०८३ धावांची भागीदारी
October 19, 2026
 India vs West Indies fifth T20 international match preview at M Chinnaswamy Stadium in Bengaluru
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी भारत-वेस्ट इंडिज संघ आज आमनेसामने
October 17, 2026
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश
October 15, 2026